
नेर्ले : महाराष्ट्राला भूषणावह असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा प्रयत्न आमच्या सरकारकडून होत आहे. माझ्या कारकिर्दीत हे स्मारक होतेय हे माझे भाग्य असल्याचे भावनिक मत सामाजिक व न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या बापू तलावाजवळील स्मारकाच्या नियोजित जागा पाहणीप्रसंगी बोलत होते.