बेळगावात धक्काबुक्की झालेल्या मंत्र्यांनी घेतली उध्दव ठाकरेची भेट...

 Rajendra Patil Yadravkar met Chief Minister Uddhav Thackeray
Rajendra Patil Yadravkar met Chief Minister Uddhav Thackeray
Updated on: 

कोल्हापूर - बेळगाव येथे काल धक्काबुक्की झालेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. कालच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्वाची ठरली. हॉटेल सयाजी येथे ठाकरे यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली. त्यांना भेटलेल्या प्रमुखांत खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, सुरेश पाटील, उद्योजक संजय घोडावत, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, विनायक साळोखे आदींचा समावेश होता. ठाकरे सयाजी हॉटेलमधून बाहेर पडताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच झुंबड उडाली. "कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

श्री. अंबाबाईचे घेतले दर्शन

दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. मंदिर परिसरातही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Abhijit Bhosale six months jail sentence
Sugarcane farmers in Karnataka are demanding a price of ₹5,500 per tonne.
Suman Patil vs Sanjay Patil
Krishna River water shortage in Sangli district
Marathi News Esakal
www.esakal.com