खासदार पाटील यांनी आलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये. त्यावर फेरविचार केला जावा, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत केली होती.
सांगली : कर्नाटकातील आलमट्टी धरणाची (Almatti Dam Karnataka) उंची वाढवण्यास जल लवादाने मान्यता दिल्यानंतर कृष्णा खोऱ्यातील कोणत्याच राज्याने विरोधात केंद्र सरकारकडे (Central Govt) तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषयच येत नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांना लेखी स्वरूपात दिला आहे.