नगरमध्ये प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाची हत्या

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

तळेगाव दिघे (जि. नगर) : बारावीत शिकणाऱ्या एकाची प्रेमप्रकरणातून चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. प्रमोद संजय वाघ ( वय 17, रा. तिगाव ) असे संबंधित अल्पवयीन मुलाचे नाव आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गुरुवारी या घटनेचा पर्दाफाश करीत खूनप्रकरणी मित्रास ताब्यात घेतले.

संगमनेर येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात प्रमोद संजय वाघ हा बारावीत शिकत होता. शनिवारी (ता. ६) कॉलेजला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, घरी परतला नव्हता. शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याचे आजोबा भिकाजी कारभारी सांगळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर पोलिस ठाण्यात त्याचे अज्ञातांकडून अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अश्विनी टिळे, हेड कॉन्स्टेबल परमेश्वर गायकवाड, पोलिस नाईक बाबा खेडकर, लुमा भांगरे यांच्या पथकाने मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे शोध घेत त्याच्या एका अल्पवयीन मित्रास ताब्यात घेत कसून चौकशी केली.

शनिवारी ( ता. संगमनेर ) दुपारी फिरण्यासाठी कपालेश्वर डोंगरावर गेले असता प्रेमप्रकरणातून वादावादी झाल्यांनतर चाकूने भोसकून प्रमोद वाघचा खून केल्याची कबुली आरोपी मित्राने दिली. आरोपीस घटनास्थळी नेले असता त्याठिकाणी मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी पंचनामा करीत गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत केला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.

Web Title: Minor boy murdered by love affair in Ammednagar