अपघातात लहान मुलगी व दुचाकीवरील चालक यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी गार्गी पाटील हिचा डोक्यास गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
Bike-Tanker collision claims young girl’s life; police investigate tragic incident.Sakal
इस्लामपूर : येथील पेठनाक्याजळ राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याकडेला लावलेल्या टँकरला मोटारसायकलची धडक बसल्याने झालेल्या अपघातात गार्गी रवींद्र पाटील (वय ५) हिचा मृत्यू झाला. रोहन राजेंद्र पाटील (वय २४, येडेनिपाणी, ता. वाळवा) हे गंभीर जखमी झाले आहेत.