संभाजी महिपती तडाखे जनावरांसाठी वैरण आणण्यास आपल्या सर्जा बैल व एक्का घेऊन गेले होते. शेतातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. एक हात, एक पाय जड झाल्याचे जाणवले.
मांगले : ते जनावर मुकंच; पण लहान खोंड असताना जीव लावून सांभाळ केल्याची परतफेड एका मुक्या जीवाने केली. मालकावर आलेले संकट ओळखून त्याने वेळीच मदत केली. मांगलेतील संभाजी तडाखे (Sambhaji Tadakhe) यांच्याबाबतीत घडलेली घटना ‘माणूस आणि मुक्याजीवाचं सहजीवन’ कसे मिसळले आहे, हेच अधोरेखित करून देते.