मिरजेत बनला पाच हजार लिटर शिरकुर्मा, पण कुणासाठी 

IMG_9715.JPG
IMG_9715.JPG
Updated on


सांगली ः मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठा सण असणारा रमजान ईद शहर आणि परिसरात उत्साहात साजरी होत आहे. मिरजेत हयात फौंडेशनतर्फे पाच हजार लिटर शिरकुर्मा तयार करण्यात आला असून 3645 कुटूंबांना याचे वाटप करण्यात आले. गोरगरिबांसह सफाई कर्मचारी, पोलिस शिरकुर्मा देवून ईद साजरी करण्यात आली. 

गेल्या महिनाभरापासून कडक उपवास केल्यावर मुस्लिम बांधवांनी आज ईद साजरी केली. दरवर्षी ईदनिमित्त खरेदीला उधाण आलेले असते. मात्र, या वेळी कोरोनामुळे खरेदीवर परिणाम झाला आहे. देशावर कोरोनाचे संकट असल्याने सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला. त्यानुसार आज सामूहिक नमाजपठण न करता आपल्या घरातून नमाजपठण करण्यात आले. कोरोनापासून देशाला मुक्त करा, अशी प्रार्थनाही करण्यात आली. 

याचबरोबर मिरजेतील हयात फौंडेशनतर्फे पाच हजार लिटर शिरकुर्मा तयार करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तो बनविण्यात आला. सुमारे 3645 कुटुंबांना वाटप करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्‍यक सेवेत असणाऱ्यांसह सफाई कर्मचारी, पोलिस यांनाही शिरकुर्मा देवून सण उत्साहात साजरा करण्यात आला. घरात रहा, सुरक्षित रहा असा संदेशही यावेळी देण्यात आला. 

हयात फौंडेशनचे शकील पिरजादे, मुसा समडोळे, इरफान पिरजादे, आरकान बेग, पीर काझी, वसीम रोहिले यांच्यासह फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम केला. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

India sugar price hike due to production decline
BSNL network problem in Sangli villages
Solapur crime
Warana Dam gates opened
Marathi News Esakal
www.esakal.com