esakal | मिरज बस स्थानक बनले खड्ड्यांचे ‘आगार’ | Paschim Maharashtra
sakal

बोलून बातमी शोधा

miraj bus stand

मिरज बस स्थानक बनले खड्ड्यांचे ‘आगार’

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज : वैद्यकीय नगरीचे बस स्थानक अनेक समस्यांनी ग्रासले आहे. प्रवेशद्वावरील खड्ड्यांनी प्रवाशांचे स्वागत होत आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुरळा अशीच अवस्था मिरज बस स्थानकाची झाली आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर महिना भरापुर्वीच महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामुळे कर्नाटकसह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातून उत्तम वैद्यकीय सेवेसाठी प्रवासी मिरज बस स्थानकात येत असतात. मात्र, येथील अस्वच्छता, खराब रस्ते, पिचकारी युक्त परिसर आणि चोरी यामुळे वैतागत असल्याची स्थिती आहे.

मिरज शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय आहेच, मात्र बस स्थानकातही याला अपवाद राहिलेले नाही. एरवी शहरातील विविध प्रश्नांवर आंदोलने करणाऱ्या सामाजिक संघटना गप्पा का? असा सवालही विचारला जात आहे. मिरज बस स्थानकातून एकाच दिवशी तीन मोबाईल आणि एक पाकीटमारीचा प्रकार घडला. यावेळी एका विद्यार्थिनीने मोबाईल चोरीची तक्रार दिली तर अन्य दोघींनी पोलिसांच्या प्रश्नांचा सिसेमारा टाळण्यासाठी तक्रारीकडे पाठ फिरवल्याचे समजते.

मिरज वैद्यकीय नगरीमुळे बस आणि रेल्वे स्थानक कायम प्रवाशांनी भरलेले असते. यामुळे येथे तितकीच पोलिस प्रशासनाची सुरक्षा महत्वाची यामुळे येथे पुर्णवेळ या बस स्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

सध्या मोजक्याच रेल्वे सुरू असल्यामुळे कोल्हापूर, सातारा, कर्नाटक, मुंबई, पुणे या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता सुविधांचा मात्र अभाव दिसून येत आहे.

हेही वाचा: अण्णा दावल ती दिशा 'पूर्व', तरीबी कात्रजच्या घाटाची भीती!

मिरज बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात गेली सहा महिने अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे घडत आहेत. वास्तविक हा परिसर महात्मा गांधी पोलिस चौकीच्या कार्यक्षेत्रात येतो. ही गुन्हेगारी रोखावी म्हणून स्टेशन परिसरात पोलिस चौकीची मागणी सुधार समितीनेकेली आहे.

- अॅड. ए. ए. काक्षी, संस्थापक, सुधार समिती मिरज

मिरज बस स्थानकातील सुविधा आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘मी मिरजकर फौंडेशन’कडून प्रवासी समितीची स्थापना करून प्रवाशांच्या सोई सुविधा सोडविण्याकडे लक्ष दिले जाणार आहे.

- सुधाकर खाडे, संस्थापक, मी मिरजकर फौंडेशन

बस स्थानकातील चोऱ्यांबाबत गांधी चौकी पोलिस प्रशासनास पुर्ण वेळ कर्मचारी द्यावा, अशी मागणी केली आहे. शिवाय स्थानकातील खड्डे आणि इतर सुविधांसाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. लवकरच सुसज्ज बस स्थानक करण्याचा प्रयत्न करू.

- शिवाजीराव खांडेकर, आगारप्रमुख, मिरज

loading image
go to top