मिरजेत कोरोनाने मृत रूग्णाचा अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्यांनी पळवला...काय घडले वाचा... 

प्रमोद जेरे 
Monday, 3 August 2020

मिरज(सांगली) -  शहरातील पंढरपुर रस्त्यावरील महापालिकेच्या कोव्हीड स्मशानभुमीत काल (ता.2) दहन दिलेल्या एक मृतदेह अर्धवट जळाल्याचा प्रकार आज उघडकीस आला. यापैकी मृतदेहांचे एका अर्धवट जळालेले अवशेष भटक्‍या कुत्र्यांनी शेजारील शेतांमध्ये ओढत नेल्याने सबंधित शेतकरी आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले. महापालिका आरोग्य आधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांनी भेट देऊन स्मशानभुमीला संरक्षण भिंत बांधण्यासह, कुपवाड आणि मिरज कृष्णाघाट येथील स्मशानभुमीतील डिझेल दाहिनी सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानतंर येथील नागरिक शांत झाले. 

मिरजमध्ये जिल्ह्याचे कोव्हीड रुग्णालय सुरू झाल्यानतंर कोव्हीडने मृत झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी पंढरपुर रस्त्यावरील स्मशानभुमीची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अत्यंसस्कार करण्याची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र शववाहिका, कर्मचा-यांना संरक्षण साधने याचाही पुरवठा करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासुन हे सर्व कर्मचा-यांचे काम व्यवस्थित सुरू आहे. रविवारी ( ता. 2 ) रोजी एका दिवसात या ठिकाणी पाच मृतदेहांवर अत्यंसस्कांर करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत थांबून मृतदेह जळाल्याचे पाहुन कर्मचारी घरी गेले.

त्यानतंर यापैकी एक मृतदेह अर्धवट जळाला आणि त्याचे काही अवयव स्मशानभुमी भोवतालच्या भटक्‍या कुत्र्यांनी शेजारच्या शेतापर्यंत ओढत नेले. हा प्रकार शेतक-यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत काही कार्यकर्त्यांना बोलाऊन घेतले. मिरज शहर सुधार समीती, कॉंग्रेसचे पदाधिका-यांसह अनेकांनी या ठिकाणी गर्दी केली. येथे कोव्हीड मृतदेहावरील अंत्यसंस्कार करु नयेत अशी मागणी केली. यावेळी महापालिकेचे आरोग्य आधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांनी तातडीने या ठिकाणी येऊन स्थानिक शेतक-यांशी चर्चा केली आणि स्मशानभुमीसभोवती संरक्षण जाळी बसवण्यासह कर्मचारी संख्या वाढवणे, या ठिकाणी संरक्षण कर्मचारी नियुक्त करणे आणि उपाययोजना त्वरीत करुन घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. याशिवाय सांगली, आणि कुपवाड येथील डिझेलदाहिनी त्वरीत सुरू करण्यासाठीही आपण स्वतः प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शिष्ट मंडळास सांगितले. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj Corona snatched the half-burnt body of a dead patient by dogs . read what happened .