
मिरज : सांगली रस्त्यावरील चंदनवाडीनजीक इलेक्ट्रिक मोटारीवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात इलेक्ट्रिक मोटारीसह मालवाहू दोन वाहने आणि दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात तिघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास अपघात झाला. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.