सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ७८ जागांसाठी आतापर्यंत २५४८ अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येसोबत नाराजांची संख्याही वाढली आहे. .एकेकाळी वाजत-गाजत अर्ज भरायला येणारे उमेदवार आज दबक्या पावलांनी येत असल्याचे दिसले, तर मिरज व कुपवाडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिका मध्यवर्ती कार्यालयासमोर अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. इच्छुकांनी समर्थकांसह येत उमेदवारी अर्ज दाखल केले..PMC Election Nominations : धनकवडी–सहकारनगर कार्यालयात उमेदवारांची गर्दी; ५९ जणांचे नामनिर्देशन अर्ज दाखल!.सांगलीत तरुण भारत स्टेडियम, माळ बंगला येथील अग्निशमन विभाग आणि विश्रामबागमधील महानगरपालिका कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. एकेकाळी पक्षाची उमेदवारी मिळाली की, उमेदवार वाजत-गाजत अर्ज दाखल करायला येत असायचा. .काही अतिउत्साही फटाके फोडून आधीच आनंदोत्सव साजरा करायचे. यावेळचे चित्र वेगळे आहे. मिरजेत काही उमेदवारांनी हलगीच्या कडकडाटात उमेदवारी अर्ज दाखल केला, तर सांगली, कुपवाडमध्ये अनेक प्रमुख उमेदवारांनी शांततेत अर्ज दाखल केले आहेत..Sangli Election : नेत्यांच्या बैठका, कानातल्या सूचना आणि अर्जांचा धडाका; सांगली-मिरज-कुपवाडमध्ये निवडणूक तापली.अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक आहे. राज्यातील प्रमुख आठ पक्षांसह कुठल्याही युती-आघाडीने अधिकृतरीत्या पक्षाची यादी जाहीर केलेली नाही. उर्वरित इच्छुकांची नाराजी नको म्हणून पक्षाच्या उमेदवाराला देखील गुपचूप बोलावून ए बी फॉर्म दिले जात आहेत. .त्यामुळे आज पक्षांच्या संभाव्य यादीत स्थान मिळवले असले, तरी कुण्याही उमेदवारांसोबत त्यांचा पाठीराखा किंवा बडा नेता अर्ज भरायला केंद्रात आला नाही. उमेदवारासोबत दोघांनाच परिसरात येण्याची परवानगी आहे. अर्ज भरायचा शेवटचा दिवस उद्या आहे. उद्या तरी उमेदवारांसोबत बडे नेते दिसणार का, अशी चर्चा आहे..मिरजेत शक्तिप्रदर्शनउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिका मध्यवर्ती कार्यालयासमोर अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. इच्छुकांनी समर्थकांसह येत उमेदवारी अर्ज दाखल केले. बालगंधर्व नाट्यगृहातही उमेदवार आणि कार्यकर्त्यांत उत्साह दिसला. हलगीच्या कडकडाट करत उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले..मिरजेतील संभाव्य उमेदवारांनी आज आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत आपले अर्ज दाखल केले. मिरजेत अगदी काहीच दिवसात राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. शहरातील प्रमुख वर्दळीच्या भागात प्रक्रिया सुरू असल्याने पोलिसांनीही तांदूळ मार्केट, गाडवे चौक परिसरात बंदोबस्त ठेवला होता..कुपवाडमध्ये उमेदवारांची लगबगकुपवाडमध्ये सोमवारी सकाळपासूनच हालचालींना वेग होता. पक्षांकडून उमेदवारी जाहीर असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी कार्यालयात दुपारी एकनंतर हजेरी लावली. केंद्रात गर्दी होऊ नये, यासाठी त्यांच्यासोबत आलेले समर्थक प्रवेशद्वाराबाहेर शिस्तीत उभे होते. वाहनेही कार्यालयापासून दूर लावण्यात आली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली..अपक्ष उमेदवारीकडे मोर्चाकाही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने काही इच्छुकांनी मात्र अपक्ष उमेदवारीकडे मोर्चा वळवला. पक्षाकडून तिकीट डावलल्यानंतरही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी सरसावले. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरून थेट जनतेच्या पाठिंब्यावर विजय मिळवण्याचा आत्मविश्वास अपक्षांनी व्यक्त केला..कोण, कुठे अर्ज भरते..?सांगलीमध्ये तरुण भारत स्टेडियम प्रभाग १२, १३, १४ आणि १६, माळ बंगला अग्निशमन विभागात प्रभाग ९, १० व ११, विश्रामबाग येथील गणेश मंदिराशेजारील महानगरपालिका कार्यालयात प्रभाग १५, १७, १८ व १९, कुपवाडमध्ये महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात प्रभाग १, २ आणि ८, मिरजेतील विभागीय कार्यालयात ३, ४ आणि ६ तर बालगंधर्व नाट्यगृहात प्रभाग ५, ७ आणि २० मधील इच्छुक उमेदवारी अर्ज भरत आहेत. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.