Miraj Government Hospital RCC slab collapse
esakal
मिरज : मिरजेच्या शासकीय रुग्णालयात काळ तर आला होता; पण वेळ आली नव्हती! काल दुपारी तिथे जे घडलं, ते अंगावर काटा आणणारं होतं; पण त्यानंतर जे पाहायला मिळालं, ते माणुसकीचं जिवंत रूप होतं. मिरज शासकीय रुग्णालयाचे नवे प्रवेशद्वार बांधण्याचे काम नेहमीप्रमाणे सुरू (Miraj Government Hospital Accident) होते. पश्चिम बंगालमधून आलेले सात तरुण मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी तिथे घाम गाळत होते. दुपारची वेळ होती. अचानक एक मोठा आवाज झाला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले! प्रवेशद्वाराच्या वरील बाजूचा भलामोठा आरसीसी स्लॅब पत्त्यासारखा कोसळला. अवजड सिमेंट, लोखंडी सळ्या आणि ढिगाऱ्याखाली ‘ते’ सातही जण गाडले गेले. धुरळा आणि किंकाळ्यांचा आक्रोश पसरला.