
मिरज : संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संगीत सभेतील रविवारी रात्रीच्या दुसऱ्या सत्राची मैफल आठ तास रंगली. रात्री नऊ वाजता सुरू झालेल्या या मैफलीची सुरवात स्थानिक कलाकार सदाशिव मुळे यांच्या सनई वादनाने झाली. नंतरच्या मैफलीत नऊ दिग्गजांनी गायन, वादन, गझलचे सादरीकरण केले. शहनाई वादन, शास्त्रीय गायन, सारंगी वादन, सतार वादन, जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले.