मिरज : येथील शासकीय रुग्णालयातून (Miraj Medical College) शनिवारी (ता. ३) अवघ्या तीन दिवसांच्या बाळाला एका महिलेने चोरून नेले. दुपारी बाराच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनासह पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली. रुग्णालयात आधीच सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असतानाही असा प्रकार झाल्याने नागरिकांतूनही संताप व्यक्त होत होता.