

मिरज : शहरातील कमानवेस परिसरात रविवारी (ता. २३) रात्री उशिरा रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा काेयता आणि धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला. कुणाल दिनकर वाली (वय २२, पवनचक्कीजवळ, इंदिरानगर, मिरज) असे मृताचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी प्रज्वल ऊर्फ गजा नायडू आणि रुपेश होळकर या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुख्य सूत्रधार अजय ऊर्फ अजित भोसले हा पसार आहे.