मिरज : लंगरपेठच्या तरुणाचा गुंडेवाडी येथे खून

डोक्यात घाव बसल्याने गंभीर जखमी
crime
crimeSakal
Updated on

मिरज : गुंडेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी लाकडी दांडक्याने डोक्यात हल्ला केल्याने जखमी झालेल्या प्रभू सूर्यवंशी (वय २२, रा. लंगरपेठ, ता. कवठेमहांकाळ) या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी सुनील ऊर्फ सोन्या शिवाजी शिंदे याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घरगुती वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की खंडेराजुरीत दोन दिवसांपूर्वी दर्गा रस्त्यावर प्रभू पोपट सूर्यवंशी व ज्ञानदेव अरविंद सूर्यवंशी (दोघे रा. लंगरपेठ) हे दुचाकीवरून जात होते. त्यांच्याबरोबर असलेल्या सुनील शिंदे यास कुटुंबातील एकाने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. तो राग आणि घरगुती वादाने चिडलेल्या शिंदे याने प्रभू सूर्यवंशी याची दुचाकी थांबवली.

जाब विचारत प्रभू याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. डोक्यात घाव बसल्याने गंभीर जखमी अवस्थेत प्रभू सूर्यवंशी यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना काल रात्री प्रभू सूर्यवंशी याचा मृत्यू झाला.

सुनील शिंदे हा मिरजेत इंदिरानगर येथे बहिणीकडे राहत होता. मृत प्रभू हा मिरजेत सुनील याच्या मेहुण्याच्या हॉटेलमध्ये काम करीत होता. याबाबत ज्ञानदेव अरविंद सूर्यवंशी याने मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुनील शिंदे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Fertilizer Shortage India
Best places to visit in Shirala during monsoon
Sahyadri Tiger Reserve tiger conservation project
Warana River water discharge news
Marathi News Esakal
www.esakal.com