
मिरज : येथील मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावून तब्बल ६८ लाख ४१ हजार २८० रुपये किमतीचा गोवा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली. याप्रकरणी सातारा येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.