
मिरज : मिरज ग्रामीण भागासह संकेश्वर, गोकुळ शिरगाव परिसरात विविध गुन्हे करून पसार असलेल्या आणि ‘मोका’ खाली कारवाई झालेल्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. कुशल ऊर्फ विशाल आनंदराव काळे (वय २६, एरंडोली, ता. मिरज) असे संशयिताचे नाव आहे. मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एरंडोली येथे कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले.