Miraj Rural Police fraud case latest news
esakal
मिरज : भोसे (ता. मिरज) येथे नऊ एकर शेतजमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून शहीद जवानाच्या पत्नीची ९५ लाख १३ हजार रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तिच्या दिराविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल (₹95.13 lakh land purchase fraud in Sangli) झाला. संजय शिवाजी बागणे (मूळ सोनी, ता. मिरज, सध्या सांगली) असे संशयिताचे नाव आहे. तो सांगली कारागृहात कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.