
मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून मिरजकडे येणाऱ्या सेवारस्त्यावर टेम्पोने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. नंदू तानाजी वायदंडे (वय ५०, कोसारी, ता. जत) असे मृताचे नाव आहे. मृत ऊसतोड मजूर नंदू हे पत्नीसह कोथळी (ता. शिरोळ) येथे मुलीकडे जात होते. याप्रकरणी त्यांच्या पत्नी सविता यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.