मिरजेत दोन गटांत राडा,पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

आठजण ताब्यात; मटण मार्केट नूतनीकरणावेळी वाद
दोन गटांत हाणामारी
दोन गटांत हाणामारीsakal
Updated on

मिरज : मिरजेत महापालिकेच्या मटण मार्केटच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्‌घाटन व कामाला सुरुवात झाल्यानंतर दोन गटांत दगड, काठ्या, विटा व हत्यारे घेऊन जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे जमाव पळाला. आज सकाळी आमदार सुरेश खाडे यांनी कामाचे भूमिपूजन केल्यानंतर मार्केटमधील गाळ्याच्या मालकीच्या वादातून दोन गटांत संघर्ष झाला. दरम्यान, दोन्ही गटांनी पोलिसांत फिर्याद दिली नाही. मात्र, पोलिसांनी स्वतः याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शांततेच्या भंगासह विविध कलमांनुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. दोन्ही गटांतील आठ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली.

अधिक माहिती अशी की, शंभर वर्षे जुनी इमारत असलेल्या मटण मार्केटच्या नूतनीकरणासाठी ६७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून, आमदार खाडे यांनी या कामाचे आज उद्‌घाटन केले. तत्पूर्वी, मटण मार्केटमधील गाळ्यांची मालकी व दुरुस्तीबाबत दोन गटांत वाद धुसफुसत होता. मध्यंतरीच्या काळात, दोन्ही गटांची समजूत काढण्यात आली होती. मांस विक्रेत्यांनी दोन आठवड्यांनंतर काम सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, लगेच कामाला सुरुवात होऊन बांधकाम मजुरांनी मासे विक्रेत्यांच्या दुकानाची भिंत पाडल्याने जमावाने बांधकाम मजुरांना मारहाण करून पिटाळले. यावरून मासे व मटण विक्रेत्यांचे दोन गट परस्परांना भिडले.

काठ्या, लोखंडी रॉड, दगड, विटांनी परस्परांवर हल्ला चढवत मारामारी सुरू झाल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक सावंत्रे यांनी घटनास्थळी घेत जमाव पांगवला. पोलिस येताच मारामारी करणारे तरुण पळून गेले. मारामारीत दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, याप्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. स्वतः पोलिस दलाकडूनच फिर्याद देण्यात आली व दोन्ही गटांतील आठ जणांना रात्री उशिरा ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com