
शिराळा : ‘‘भाजप नवीन संकल्प घेऊन जनसामान्यांसाठी काम करत आहे. कार्यकर्ता व जनतेच्या ताकदीवर पक्ष मोठा झाला असून सभासद नोंदणीत कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यामुळेच सभासद नोंदणीचे उद्दिष्ट साध्य झाले,’’ असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.