
जत : तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होत आहे. तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याचे आवर्तन कमी क्षमतेने असल्याने तलाव भरण्यापूर्वीच पाणी बंद केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी बैठकीत झाल्या. आमदार पडळकर यांनी म्हैसाळ अवर्तनातून तातडीने तीनशे क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचे आदेश दिले.