विटा : आमच्याकडे लढणारे, विरोधकांना लोळवणारे उमेदवार आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह पालिकांतून खानापूर (Khanapur) तालुक्यात परिवर्तन झाले पाहिजे. नव्यांना संधी मिळाली पाहिजे. अशा उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगितले.