
तासगाव : ‘‘शेतकरी विमा कंपन्यांबाबत अनेक शेतकरी तक्रार करत आहेत. विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी घेतला जात आहे. वेळेवर विमा न दिल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत आहे. या विमा कंपन्यांना येरवडा जेलमध्ये पाठवा,’’ अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना केली. मतदारसंघातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यथाही त्यांनी मांडली.