
तासगाव : मागील दहा वर्षांत पालिकेमध्ये काय काय झाले, यावर मला चर्चा करायची नाही. मात्र नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक याठिकाणी झालीच पाहिजे, अशी अपेक्षा आमदार रोहित पाटील यांनी तासगाव पालिका आढावा बैठकीत व्यक्त केली. कस्तुरबा रुग्णालयात डायलिसिस सेंटर उभे करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.