Sangli News : आबांच्या पत्नीशी चर्चेला मुख्यमंत्र्यानी आमदार बाबरांना पाठवले, फडणवीसांना केले फोन

दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची पत्नी आमदार सुमनताई पाटील यांचे टेंभू योजनेच्या पाणी प्रश्‍नावर सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु राहिले.
Sumantai Patil
Sumantai PatilSakal

सांगली - दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची पत्नी आमदार सुमनताई पाटील यांचे टेंभू योजनेच्या पाणी प्रश्‍नावर सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु राहिले. आबांची पत्नी उपोषणाला बसल्याने सर्वपक्षिय आणि विशेषतः सरकारमधील नेतेही त्यांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत. राज्यभरातून आबांवर प्रेम करणारे विविध पक्षातील आमदार सरकारशी याबाबत बोलत आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आबांचे जिवलग मित्र आमदार अनिल बाबर यांना सुमनताईंशी चर्चेसाठी पाठवले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून सुमनताईंशी चर्चा केली. आता उपोषण मागे घ्या, सगळे प्रश्‍न सोडवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अठरा गावातील लोकांशी चर्चा करून आम्ही निर्णय कळवतो, असे जाहीर केले. दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी हालचाली गतीमान झाल्या होत्या.

तासगाव तालुक्यातील आठ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १० अशा एकूण अठरा गावांचा टेंभू विस्तारीत योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आमदार पाटील यांनी गांधी जयंतीपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज त्याचा दुसरा दिवस. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी या आंदोलनात भाषण करत सरकारवर टीकेची झोड उठवली.

पालकमंत्री सुरेश खाडे, माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे सत्ताधारी नेतेही भेटीला आले. आज शिवसेना आमदार अनिल बाबर मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले. त्यांनी सुमनताईंचा हा प्रश्‍न लवकर सुटेल, असे आश्‍वस्त केले. बाकी निर्णय झाले आहेत, आदेशही निघतील, अशी ग्वाही दिली.

दरम्यान, राज्यभरातील आबा समर्थक आमदार, माजी आमदारांनी रोहित पाटील यांच्याशी आज फोनवरून चर्चा केली. जर चार दिवसांपेक्षा अधिक काळ आंदोलन लांबले तर आम्ही आमच्या जिल्ह्यात उपोषण सुरू करणार आहोत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा निरोप पाठवला आहे, असे या नेत्यांनी कळवले. त्यामुळे राज्यभर या आंदोलनाची व्याप्ती वाढू शकते, असा इशारा यानिमित्ताने सरकारला देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com