विश्वजित कदम म्हणाले, ‘‘इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर पसार असताना त्याला कोणाचा पाठिंबा होता? त्याला पळून जाण्यास मदत कोणी केली?"
कडेगाव : ‘‘महाराष्ट्राच्या अस्मितेवर जे कोणी घाव घालतील, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,’’ अशी मागणी आमदार विश्वजित कदम (MLA Vishwajit Kadam) यांनी सरकारकडे केली आहे. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करत, राज्य सरकारने अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड करणाऱ्या प्रवृत्तीला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही,’’ असा इशारा त्यांनी दिला.