महाबळेश्वर तालुक्यात मराठी पाट्यायांबाबत मनसे आक्रमक 

रविकांत बेलोशे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

भिलार - पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात मनसेने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही. तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेतले जाण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे. 

भिलार - पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात मनसेने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही. तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेतले जाण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे. 

याबाबत मनसेने महाबळेश्वर तहसीलदार, पांचगणी आणि महाबळेश्वरच्या पालिका मुख्याधिकारी व पोलीस ठाण्यात याविषयी आज निवेदन दिले आहे. यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष नितीन पार्टे, पांचगणी शहर अध्यक्ष शिवाजी कासुर्डे, तालुका विभाग अध्यक्ष विशाल गोळे, महाबळेश्वर उप शहर अध्यक्ष ओंकार नाविलकर, सर्जेराव डगारे, सागर घोडके, रविना घोडके, वैभव गोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवेदनात राज्यात मराठीला राज्यभाषेचा दर्जा आहे. आणि आपण महाराष्ट्रात राहूनही मराठीचा विसर पडल्याचे चित्र आहे. पांचगणी व महाबळेश्वर या शहर आणि मुख्य रस्त्यांवर हॉटेल्स व दुकानदारांनी अमराठी पाट्या लावल्या आहेत. बहुतेक ठिकाणी इंग्रजी किंवा हिंदीत पाट्या दिसत आहेत. त्या मराठीत असणे अपेक्षित असूनही त्या इतर भाषेत रंगवल्या आहेत. तरी व्यापारी, दुकानदार, उद्योगांच्या आस्थापनांच्या पाट्या व फलक स्वच्छ दिसतील, स्पष्टपणे वाचता येतील अशा पद्धतीने मराठी भाषेत लावण्यात यावेत असे म्हटले आहे. 

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. ‘दुकाने संस्था राजभाषा अधिनियम १९४८’ अन्वये दुकाने व संस्थांनी आपले नामपलक मराठी भाषेत लावणे व व्यवहार करणे बंधनकारक आहे. व्यवसाय उद्योग करणारी मंडळी ज्या राज्यात आर्थिक व्यवहार करून अर्थार्जन करतात, तेथील भाषेचा व मराठी लोकांचा ही माणसे मराठी भाषेच्या पाट्या न लावून अपमान करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने शहरातील दुकानदारांनी २० दिवसांत मराठी पाट्या न लावल्यास मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते आदोलन छेडून पाट्या बदलण्याची मोहीम हाती घेतील. व त्यानंतर दुकाने हॉटेल मालकांच्या बोर्डाचे होणाऱ्या नुकासानिस ते स्वतः जबाबदार राहतील. असा इशारा देण्यात आला आहे.
सोबत फोटो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS aggressor regarding marathi pati rule in Mahabaleshwar taluka