कडेगावात मोहरम साधेपणाने साजरा...दोनशे वर्षात पहिल्यांदाच गगनचुंबी ताबुतांची उभारणी व गळाभेटीची परंपरा खंडीत

संतोष कणसे
Sunday, 30 August 2020

कडेगाव (सांगली)-  हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला येथील मोहरम यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला.यावेळी ताबुतांची विधीवत पूजा करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित भाविक व नागरिकांनी कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना केली.

कडेगाव (सांगली)-  हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला येथील मोहरम यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला.यावेळी ताबुतांची विधीवत पूजा करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित भाविक व नागरिकांनी कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना केली.

आज सकाळी साडेदहा वाजता मानाचा सातभाई ताबूत जवळ प्रथम फातेहा देऊन धार्मिक विधी पार पाडला.त्यांनतर मानाचा सातभाई ताबूतचा उत्सुद घेऊन हकीम ,बागवान ,देशपांडे ,शेटे ,पाटील ,अत्तार ,इनामदार ,तांबोळी , सुतार ,माईनकर , मसूदमातासह आदी ताबूत व पंजे बारा इमाम पंजे वगैरे ठिकाणी फातेहा देऊन धार्मिक विधी पार पडला आला.यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न झाला.

येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण व यानिमित्त होणारे उंच ताबूत संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत.येथील मोहरमची ऐक्याची परंपरा आहे.या ठिकाणी मोहरम निमित्त चौदा ताबूत बसवले जातात.त्यापैकी सात ताबूत हिंदू बांधवांचे असतात.मोहरम निमित्त होणाऱ्या गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.

परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शासनाने सर्वच धार्मिक सण,कार्यक्रम रद्द केले आहेत.त्यामुळे चालुवर्षी मोहरम सणही साधेपणाने ताबूतांची उंची कमी करून साजरा करण्यात आला.दरम्यान यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला होता.
यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम,जि.प.सदस्य शरद लाड, तहसीलदार डॉ.शैलजा पाटील,उपविभागीय अधिकारी पोलीस अंकुश इंगळे,भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड आदींनी ताबूताना भेटी दिल्या.

गगनचुंबी ताबुतांच्या गळाभेटीची परंपरा खंडीत -

कोरोनामुळे दोनशे वर्षात पहिल्यांदाच मोहरम सणानिमित्त होणारा गगनचुंबी ताबुतांच्या गळाभेटीचा सोहळा व मिरवणुक यावर्षी रद्द करण्यात आली.त्यामुळे यावेळी बाहेरुन भाविक आले नाहीत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moharram is simply celebrated in Kadegaon