आषाढातल्या शेवटच्या शुक्रवारी लक्ष्मी आईच्या नैवैद्यासाठी महिलांची लगभग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mohol

आषाढातल्या शेवटच्या शुक्रवारी लक्ष्मी आईच्या नैवैद्यासाठी महिलांची लगभग

मोहोळ (सोलापूर) - आषाढ महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ग्रामीण भागातील स्त्रीवर्गामध्ये सर्वत्र लक्ष्मीआईला नैवैद्य  दाखविण्याची लगभग दिसुन येत आहे. तर अमावस्येच्या अगोदरचा शेवटचाच शुक्रवार असल्यामुळे पुरुषमंडळी मात्र मिळेल तिकडे मांसाहाराच्या पंक्ती झोडपण्यात दंग असल्याचे चित्र दिसत आहे.

 हिंदु धर्मात अनेक रूढी परंपरा सामाजिक स्थितंतरातुन  काळाच्या ओघात निर्माण झाल्या तर  काही लोप पावल्या. त्यापैकी आषाढ महिना हा एक असा महिना आहे की ज्या महिन्यामध्ये  लक्ष्मीआई, मरीआई, ताईआई, यमाई, जरीआई, म्हसोबा, अशा देवी देवंताना  विशिष्ठ प्रकारच्या मांसाहरी व शाकाहरी नैवैद्याने संतुष्ठ करण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी या महिण्यात मासांहराच्या  अनेक सामुदायीक जेवणावळीच्या पंक्ती उठत असतात. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात हा महिना म्हणजे मांसाहरी खव्वयांना एक प्रर्वणीच असते . त्यामुळे आजचा आषाढातला शेवटचा  शुक्रवार म्हणजे आषाढा नंतर येणाऱ्या  श्रावणाच्या प्रवित्र महिण्यानंतर लगेचच भाद्रपद महिण्यात गणपती, लक्ष्मी , येत असल्यामुळे आज जिकडे तिकडे आत्ता महिनाभर काहीच नाही म्हणत आग्रहाचे आमंत्रण स्वीकारून हजेरी पोहचविण्यात अनेकजण दंग आहेत .