
मोहोळ : मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिना भरापासून विविध चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते, त्याबाबत वेळोवेळी गुन्हेही दाखल झाले होते. मात्र संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हते. दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची पथके तयार करून त्यांच्या माध्यमातून संशयीतांचा शोध घेऊन तीन गुन्हे उघडकीस आणून, त्यातील तीन लाख सहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.