दक्षिण सोलापुरातील मुळेगाव, बोळकवठा, होटगी स्टेशन, वांगी, हत्तूर, बोरामणी व कुंभारीत सापडले 27 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

जिल्ह्यात सोमवारी 31 रुग्णांची भर 
जिल्ह्यात अक्‍कलकोट तालुक्‍यातील माणिक पेठेत एक, बार्शी तालुक्‍यातील वैराग, घाणेगावात प्रत्येकी एक तर दक्षिण सोलापुरातील बोळकवठा, होटगी स्टेशन, बोरामणीत प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच दक्षिण सोलापुरातील मुळेगावात सहा, वांगीत आठ, हत्तूरमध्ये सात तर कुंभारीत तिघांना कोरोनाची लागणी झाली आहे. उत्तर सोलापुरातील मार्डीत एक रुग्ण सापडला असून मार्डीतील एका 60 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता 344 झाली असून त्यापैकी 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 130 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करीत घर गाठले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील 197 रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, सोमवारी, 31 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यामध्ये अक्‍कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापुरातील रुग्णांचा समावेश आहे. 

करमाळा, माढा, पंढरपूरची कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल 
जिल्ह्यातील अक्‍कलकोट तालुक्‍यातील 47, बार्शीतील 26, मोहोळ तालुक्‍यातील 13, उत्तर सोलापुरातील 11 तर दक्षिण सोलापुरातील सर्वाधिक 96 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे करमाळा, माढा तालुक्‍यातील प्रत्येकी एक तर पंढरपूर तालुक्‍यातील दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे हे तीन तालुके कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. तर मंगळवेढा तालुका अद्याप कोरोनापासून चार हात लांबच राहिला आहे.  

जिल्ह्यात सोमवारी 31 रुग्णांची भर 
जिल्ह्यात अक्‍कलकोट तालुक्‍यातील माणिक पेठेत एक, बार्शी तालुक्‍यातील वैराग, घाणेगावात प्रत्येकी एक तर दक्षिण सोलापुरातील बोळकवठा, होटगी स्टेशन, बोरामणीत प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच दक्षिण सोलापुरातील मुळेगावात सहा, वांगीत आठ, हत्तूरमध्ये सात तर कुंभारीत तिघांना कोरोनाची लागणी झाली आहे. उत्तर सोलापुरातील मार्डीत एक रुग्ण सापडला असून मार्डीतील एका 60 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Monday 31 patients were found to be corona positive