शिराळा तालुक्‍यात येथे विजेच्या धक्‍क्‍याने वानराचा मृत्यू....शनिवारी मृत्यू झाल्याने विधीवत दफन 

बाजीराव घोडे-पाटील
Sunday, 9 August 2020

कोकरुड (सांगली)- शिराळा तालुक्‍यातील बिळाशी पैकी विरवाडी येथे एका वानराचा शॉर्टसर्किटने मृत्यू झाला. बजरंगाचा अवतार असलेल्या या वानराचा शनिवार दिवशीच मृत्यू झालेने येथील युवकांनी वानराचे विधिवत दफन केले. तसेच त्या जागेवरती बेलाचे झाड लावून त्याला श्रद्धांजली वाहिली. 

कोकरुड (सांगली)- शिराळा तालुक्‍यातील बिळाशी पैकी विरवाडी येथे एका वानराचा शॉर्टसर्किटने मृत्यू झाला. बजरंगाचा अवतार असलेल्या या वानराचा शनिवार दिवशीच मृत्यू झालेने येथील युवकांनी वानराचे विधिवत दफन केले. तसेच त्या जागेवरती बेलाचे झाड लावून त्याला श्रद्धांजली वाहिली. 

शुक्रवार (ता. 7) विरवाडी गावात काही वानरांचा समूह आला होता. अन्नाच्या शोधत असलेला हा समूह इकडून-तिकडून उड्या मारत असताना एक वानर विद्युत वहिनीला चिकटले. जोराचा विजेचा धक्का बसल्याने ते खाली कोसळले. ही गोष्ट तेथे असलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्या जखमी वानरास उचलून पाणी पाजले. पशुवैद्य डॉ. प्रकाश गायकवाड यांना बोलावून त्याच्यावर उपचार केले. मात्र शनिवारी सकाळी या वानराचा दुर्दैव मृत्यू झाला. शनिवारी या मुक्‍या प्राण्याचा झालेला मृत्यू ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला. त्यांनी या वानरावर विधीवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

गावातील महिलांनी बजरंगाचा अवतार असलेल्या या वानराचे पूजन केले. तर गावातील ग्रामस्थांनी सर्व कार्य विधिपूर्वक करून वानरास तिरडीवरून माळरानावर नेऊन दफन केले. त्या जागी बेलाचे झाड लावून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. आनंदा पाटील, अशोक पाटील, सुहास पाटील, ओंकार कदम, विलास इंगवले, मारुती पाटील, अक्षय शेडगे, रणजित पाटील, अमोल पाटील, दादासो पाटील, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते. 
दरम्यान मुक्‍याप्राण्यांच्या या दुर्दैवी मृत्युने ग्रामस्थही गहिवरले. वानराच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. गावातील युवकांनी मुक्‍या प्राण्यापोटी दाखवलेल्या माणुसकीचे परिसरातून कौतुक होत आहे. 

 

संपादन : घनशाम नवाथे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monkey dies due to electric shock in Shirala taluka . Died on Saturday