
अंकलखोप : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची वर्दी निसर्गातील पक्ष्यांकडून मिळत असते. ‘कुळीवऽ कुळीवऽऽ’ म्हणणारी कोकिळा, शेतकऱ्यांना पेरते व्हा, अशी साद घालणारा पावशा, हे नेहमीच बळिराजाला पावसाच्या आगमनासाठी सज्ज ठेवत असतात. त्याचबरोबर आणखी एक पाहुणा आज अगदी वेळेत थेट आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन ‘कृष्णा’काठावर दाखल झाला आहे. हा पाहूणा म्हणजे चातक.