दहा कोटींहून अधिक पाणीपट्टी लॉकडाऊनमध्ये थकली; आठ महिने बिले वाटप ठप्प

More than ten crore water bills pending in lockdown; Bill allocation stalled for eight months
More than ten crore water bills pending in lockdown; Bill allocation stalled for eight months
Updated on

सांगली : लॉकडाऊन काळात गेली आठ महिने महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून पाणी बिलाचे वाटपच झाले नाही. सुरवातीला तीन-चार महिने बिले वाटपावर बंधने होती. त्यानंतर कर्मचारी कोविडच्या उपाययोजनात गुंतल्यामुळे बिलांचे वाटपच ठप्प झाले. परिणामी आठ महिन्यांत दहा कोटींहून अधिक पाणी बिल थकीत आहे. सध्या पाणी बिले वाटप करण्याऐवजी मोबाईल ऍपवरून ते देण्याचा प्रयोग सुरू होणार आहे.

त्यामुळे तो महापालिका क्षेत्रात कितपत यशस्वी होतो? याबाबत साशंकता आहे. 
महापालिका क्षेत्रात घरे आणि फ्लॅटच्या तुलनेत नळ पाणीपुरवठा कनेक्‍शनची संख्या पाहिली तर मोठी तफावत दिसते. अपार्टमेंटस्‌मध्ये फ्लॅटस्‌च्या तुलनेत नळकनेक्‍शन घेतले जात नाही. दोन किंवा तीन कनेक्‍शनवर संपूर्ण अपार्टमेंटला पाणी पुरवठा होता. तसेच काही ठिकाणी भाड्याने खोल्या असतील तरी एकाच कनेक्‍शनमधून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे घरांची संख्या आणि नळ कनेक्‍शन यामध्ये तफावत दिसते. महापालिका क्षेत्रात दर दोन महिन्यांनी 320 रुपये सरासरीने पाणी बिलांचे वाटप केले जाते. काही ग्राहक दोन महिन्यांने, सहा महिन्यांनी तसेच वर्षानंतर बिल भरतात. 

लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशानुसार पाणी बिले वाटप सुरवातीला बंद होते. परंतु जूनपासून शिथिलता आली तरी पाणी बिलांचे वाटप केले नाही. कोविड साथीच्या उपाययोजनात सर्व कर्मचारी गुंतले. त्यामुळे आठ महिने बिलांचे वाटपच झाले नाही. महापालिका क्षेत्रात साधारणपणे 82 हजार नळ कनेक्‍शन्स आहेत. त्यामुळे आठ महिन्यांची थकबाकी दहा कोटींहून अधिक आहे. तसेच मार्चपूर्वीची थकबाकीही मोठी आहे. एकीकडे महापालिका आर्थिक अडचणीत असताना पाणीपट्टी वसूल झाली नाही. आता मोबाईल ऍपद्वारे ग्राहकांची नोंदणी केली जात आहे. लवकरच छापील बिले न देता मोबाईलवर संदेश पाठवून बिलाची रक्कम कळवली जाणार आहे. त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी होणार? याची साशंकता आहे. त्यामुळे पाणीपट्टी थकबाकीचा आकडा मात्र वाढतच जाईल अशी परिस्थिती आहे. 

छापील बिले नसल्यास साशंकता 
आजही मोबाईल किंवा ऑनलाईन वापराबाबत म्हणावी तशी साशंकता आहे. छापील बिले न पाठवता मोबाईलवर पाणी बिले पाठवल्यास ती भरण्याबाबत ग्राहक कितपत तत्परता दाखवणार? असा प्रश्‍न आहे. सध्या बिले आली नसताना स्वत:हून जाऊन विचारणा करणाऱ्या जागृत ग्राहकांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे छापील बिले न पाठवल्यास वसुलीबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. 

वीजबिले वितरित... पाणीबिले का नाही! 
लॉकडाऊन काळात सुरवातीला तीन महिने महावितरणकडून वीज मीटर रीडिंग, बिल वाटप बंद करण्यात आले होते, परंतु ऑनलाईन बिल आणि भरणा आदी सुविधा दिली. त्यानंतर तीन महिन्यांचे बिल एकदम दिल्यानंतर सर्वत्र बिल भरण्यास विरोध होऊ लागला. त्यानंतर जूनपासून वीज बिलाचे वाटप सुरू झाले. परंतु महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आठ महिने झाले तरी पाणी बिलाचे वाटप सुरू नाही. त्यामुळे एकदम आठ महिन्यांच्या बिलाचा आकडा तो देखील ऑनलाईन पाहून नागरिक संताप व्यक्त करतील अशी परिस्थिती आहे. सध्या बिले माफ करावी, अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केलीच आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com