अक्काताई येडके या अर्धांगवायू आजाराने चार महिन्यापासून आजारी आहेत. तेव्हापासून त्या उपचारासाठी कर्नाटकात ये-जा करतात. तेथील औषधाने त्यांच्यात सुधारणा झाली होती. औषधोपचारासाठी त्यांची ही शेवटची खेप होती.
इटकरे : औषधोपचारासाठी निघालेल्या माय-लेकींवर रस्त्यातच काळाने घाला घातल्याची घटना आज सकाळी घडली. आशियाई महामार्गावरील कामेरी-येडेनिपाणी दरम्यान रिक्षा अपघातात (Asian Highway Accident) दोघींचा मृत्यू झाला. अक्काताई भुजंग येडके (वय ७० रा. नागाव ता. वाळवा) व शारदा लक्ष्मण सुपणे (वय ५० रा. धनगर गल्ली, इस्लामपूर) अशी मृतांची नावे आहेत.