कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत माय-लेकींचा दुर्दैवी अंत; मार्चनंतर होतं मुलीच्या लग्नाचं नियोजन, वडिलांना भावना अनावर

Mahakumbh Mela Stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराज संगमघाट (Prayagraj Sangam Ghat) येथे आयोजित महाकुंभमेळ्यात बुधवारी पहाटे गर्दी उसळली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाला.
kumbh Mela Stampede
Mahakumbh Mela Stampedeesakal
Updated on
Summary

मेघा हिचे वडील दीपक पाटबंधारे विभागात सेवा बजावितात. त्यांना दोन मुली. पैकी मोठ्या मुलीचा विवाह झाला आहे. लहान मुलगी शिक्षण घेत होती. अलीकडे तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

बेळगाव : अलिकडे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मेघाचे मार्चनंतर लग्न (Marriage) करायचे ठरले होते. एकदा लग्न झाल्यानंतर मुलीला कुंभमेळ्याला जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे आईसोबत मुलीला प्रयागराज येथील कुंभमेळ्याला पाठविले. परंतु, बुधवारी (ता. २९) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये (Mahakumbh Mela Stampede) पत्नीसह मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती मेघाचे वडील दीपक हत्तरवाठ यांनी पाणाविलेल्या डोळ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com