
इटकरे : औषधोपचाराला निघालेल्या मायलेकींवर रस्त्यातच काळाने घाला घातल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. आशियाई महामार्गावरील कामेरी - येडेनिपाणी दरम्यान अनोळखी वाहनाने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा सेवा रस्त्यावर कोसळली. यात दोघींचा मृत्यू झाला. अक्काताई भुजंग येडके (वय ७०, नागाव, ता. वाळवा) व शारदा लक्ष्मण सुपणे (५०, धनगर गल्ली इस्लामपूर) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे.