
टेंभुर्णी : झोप येत असल्याने कार महामार्गाच्या बाजूला लावून झोपलेला मुलगा व त्याच्या आईला तीन चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून व डोळ्यात चटणी टाकून सुमारे सहा लाख रूपये किंमतीचे बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व साडे तीन हजार रूपये रोख असा एकूण सहा लाख तीन हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेले.पुणे सोलापूर महामार्गावर भुईंजे हद्दीतील यशराज हाॅटेल समोर शनिवारी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटे च्या सुमारास ही घटना घडली असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.