नाईक यांच्या राहत्या घरीच संशयितांनी दोघांचा खून केल्याने घरात रक्ताचा सडा पडला होता. स्वयंपाक घर, खोली रक्ताने माखले होते. उंबऱ्याच्या बाहेरही रक्ताचे डाग दिसत होते.
निपाणी : आई व तिच्या तरुण मुलाचा घरात घुसून निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. ५) सकाळी अक्कोळ (Akkol Murder Case) येथे उघडकीस आली. मंगल सुकांत नाईक (वय ४५) आणि प्रज्ज्वल सुकांत नाईक (१९) अशी मृतांची नावे आहेत. प्रेमसंबंधात (Love Affair) अडथळा ठरत असल्याने तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने हे कृत्य केले असून, याप्रकरणी रवी खानापगोळ व लोकेश नाईक (दोघेही रा. कोणकेरी, ता. हुक्केरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.