पंढरपुरात काय घडला धक्कादायक प्रकार? वाचा

भारत नागणे
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदिरा जवळ शुक्रवारी (ता. १०) अनोळखी स्त्री आपल्या दोन महिन्याच्या स्त्री जातीच्या अर्भकाला घेऊन बराच वेळ बसली होती. मात्र तिच्या मनात वेगळचं काही तरी सुरू होतं. बराच वेळ बसल्यानंतर कठोर झालेल्या या महिलेने जवळच असलेल्या एका दुकानदाराकडे आपल तान्हुलं बाळ सोपवून लघुशंका करून येते, अशी बतावणी केली.

पंढरपूर (सोलापूर) : आपल्या दोन महिन्याच्या स्त्री जातीच्या अर्भकाल सोडून निष्ठुर झालेली आई परागंधा झाल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात समोर आला आहे. "माता न तू वैरी" अशीच घटना या अर्भकाच्या बाबतीत घडली आहे.
पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदिरा जवळ शुक्रवारी (ता. १०) अनोळखी स्त्री आपल्या दोन महिन्याच्या स्त्री जातीच्या अर्भकाला घेऊन बराच वेळ बसली होती. मात्र तिच्या मनात वेगळचं काही तरी सुरू होतं. बराच वेळ बसल्यानंतर कठोर झालेल्या या महिलेने जवळच असलेल्या एका दुकानदाराकडे आपल तान्हुलं बाळ सोपवून लघुशंका करून येते, अशी बतावणी केली. दुकानदार सचिन व्यवहारे यांनी त्या अनोळखी महिलेची बराच वेळ वाट पाहिली. परंतु ती महिला बाळ सोडून गेल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज वाडेकर, धैर्यशील काळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती देवून बाळ महिला पोलिस प्रियंका मोहिते, सोनाली इंगोले आणि पोर्णिमा हादगे यांच्याकडे सुर्फूत केले.
सकाळपासून भुकेने आणि आईच्या मायाने व्याकुळ झालेल्या बाळाला या महिला पोलिसांनी मायेची उब दिली. त्यानंतर बाळाच्या चेहऱ्यावर कुठे हास्येची लखेर उमटल्याचे पाहायला मिळाले. सर्व शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर या बाळाला येथील नवरंगे बालकाश्रमात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात महिले विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mother left the baby in Pandharpur