स्वखर्चाने आईच्या  स्मरणार्थ उभारली स्मशानभूमी 

KKR20A01169_pr.jpg
KKR20A01169_pr.jpg
Updated on

कोकरुड : (सांगली) चिखलवाडी (ता शिराळा) येथील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक कुबेर सावंत यांनी स्वखर्चातून स्मशानभूमी बांधून गावातील कित्येक वर्षांचा प्रश्न मार्गी लावून समाजसेवेचे एक आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे. 

चिखलवाडी गाव लोकसंख्या कमी असल्याने एक सदस्यावरच समाधानी होते, कालांतराने लोकसंख्या वाढली स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाली आणि गावातील लोकांना आधार मिळाला. मात्र काही प्रश्न तसेच राहिले. गावातील सावंत व माने भावकीतील लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मयताचा मृतदेह घेऊन 2 ते 3 किलो मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीकडे जावे लागत होते.

पावसाळ्यात तर लोकांना खूपच त्रास व्हायचा .त्यामुळे लोक जागा मिळेल तिथे उघड्यावर अग्नी देत होते. जागेची व निधीची कमतरता असल्याने स्वतंत्र दुसऱ्या स्मशानभूमीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून अडकून पडला होता. 
गावातील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक कुबेर सावंत यांच्या मातोश्री जुलै 2016 साली मयत झाल्यानंतर गावातील अडचण लक्षात घेऊन आईच्या स्मरणार्थ नवीन स्मशानभूमी बांधायचा त्यांनी मनाशी निश्‍चय केला.

व काही दिवसात स्वखर्चातून लाखो रुपये खर्च करून, कॉंक्रीटचे छत असणारी स्मशानभूमी बांधून हे काम पूर्णत्वास नेले. रंगरंगोटी करून कै. रुक्‍मिणी रामचंद्र सावंत "वैकुंठ धाम" असे नाव दिले. 25 ऑक्‍टोबर रोजी या वास्तूचे साधेपणाने लोकार्पणही करण्यात आले. 

संपादन ः अमोल गुरव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Irwin Bridge road damage
Ishwarpur Sangli dowry death case
Murder in Patgaon, Miraj: Dnyaneshwar alias Mauli Patil allegedly killed in a sharp-weapon attack
Forest Officer Team
Marathi News Esakal
www.esakal.com