41 तासापूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा घोटून आईनेच केला खून 

SHAILESH PETKAR
Monday, 19 October 2020

देशभर नवरात्रोत्सव सुरु आहे. देवीची आराधना केली जातेय. स्त्रीला नवदुर्गा म्हणून मानपान केला जातोय, मात्र याच धामधुमीत एक हादरवून सोडणारी घटना सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात घडली आहे.

सांगली ः देशभर नवरात्रोत्सव सुरु आहे. देवीची आराधना केली जातेय. स्त्रीला नवदुर्गा म्हणून मानपान केला जातोय, मात्र याच धामधुमीत एक हादरवून सोडणारी घटना सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात घडली आहे. मानवी मनाला प्रचंड वेदना देणारी ही बातमी आहे. 41 तासांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म देणाऱ्या आईने आपल्याच हाताने त्या मुलीचा गळा घोटून खून केला आहे. सुन्न करणाऱ्या या प्रकाराने संपूर्ण सांगली हादरून गेली आहे. ही महिला मूळची बेळगावची असून यामागे नेमके काय कारण घडले, याचा पोलिस शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही महिला दोन-तीन दिवसांपूर्वी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली. काल शनिवारी तिने एका गोंडस कनेल्या जन्म दिला. भारतभर दुर्गामातेची आराधना केली जात असताना, घटस्थापना होत असताना एका गोंडस मुलीने जन्म घेतला. अन्यत्र, लेकीच्या जन्माचे स्वागत करत, दुर्गा आली घरी असे आनंदाने सांगितले जात असताना या लेकीच्या भाळी मात्र अवघ्या काही तासांत मृत्यू लिहला होता. तोही जिने जन्म दिला त्याच आईच्या हातून... या बातमीने संपूर्ण विश्रामबाग पोलिस ठाणे हादरून गेले. पोलिसांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात धाव घेतली. या महिलेकडे कसून चौकशी सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mother strangled the girl born 41 hours ago and killed her