Mother's Day : ‘मुन्नाची आई’ हाच माझा सन्मान...

Mother's Day : ‘मुन्नाची आई’ हाच माझा सन्मान...

शकुंतला महाडिक यांना सहा मुली आणि दोन मुले. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आम्ही पंढरपूरहून कोल्हापुरात आलो. भैयाचे १९९२ ला अपघाती निधन झाले. त्यानंतर तीनच वर्षात पती भीमराव यांचेही निधन झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मुले सांभाळली, त्यांच्यावर चांगले संस्कार केले. त्यामुळे अतिशय लहान वयात कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर असूनही मुन्ना डगमगला नाही, हे शकुंतला यांनी केलेल्या संस्काराचे काम. 
भैयाच्या जोरावर मुन्ना काहीही करत होता; पण कुटुंबाची जबाबदारी पडली आणि मुन्नाच्या वागण्यात, बोलण्यात बदल झाला. अतिशय धीरोदात्तपणे त्याने ही जबाबदारी नुसती पेलली नाही, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मी तुमच्यामागे ठामपणे उभा आहे, काही काळजी करू नका, असा विश्‍वासही दिला. मी त्याच्याबरोबरच होतेच; पण एक कुटुंबप्रमुख नात्याने तो नेहमीच पुढे राहिला. 

पती भीमराव यांना तालमीची मोठी आवड. वडिलांचा हा वारसा जोपण्यासाठी मुन्नालाही तालमीत जाण्यास सांगितले. मी स्वतः व त्याचे वडील त्याच्याकडून व्यायाम करून घेत होतो. कुटुंबाची जबाबदारी आल्यानंतर तालीम सोडून त्याने व्यवसायात लक्ष घातले. कुटुंबातील प्रत्येकावर प्रेम करणे, त्यांची आपुलकीने चौकशी करणे आणि कुटुंबातील नाते जपण्यासाठी शकुंतला यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच आज धनंजय महाडिक वाटचाल करत आहेत. आज घरातून बाहेर पडताना पहिल्यांदा आईचे दर्शन, मगच दौऱ्यास सुरवात, असा संस्कार नियमच धनंजय यांनी तयार केला. त्याचबरोबर आईबरोबर बहिणीही धनंजयबरोबर खांद्याला खांदा लावून उभ्या असतात. मुन्नाचेही बहिणींवर प्रचंड प्रेम आहे. 

भाऊबीज आणि रक्षाबंधन या दोन दिवशी तो कुठेही असला तरी घरी येतोच. सर्व बहिणीही त्यावेळी घरी येतात. या दोन दिवशी घर कसे भरल्यासारखे वाटते. बहीण-भावातील हे प्रेम पाहूनच मला कृतार्थ झाल्यासारखे वाटते आणि आनंद मिळतो. चांगल्या संस्काराचे हेच फळ असते. मुन्नाचे लग्न झाले आणि त्याला अरुंधतीसारखी एक चांगली पत्नी मिळाली. या दोघांनी त्यांच्याही मुलांवर आई शकुंतला यांच्याप्रमाणेच चांगले संस्कार केले. मुन्नांचा एक नियम आहे. कितीही काम असू दे, आमची विचारपूस केल्याशिवाय, आमचे दर्शन घेतल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नाही आणि रात्री तो झोपतही नाही. 

२०१४ च्या निवडणुकीत मुन्ना खासदार झाला आणि त्याने आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचे चीज झाल्याचे त्या सांगतात. पाच वर्षांत मुन्नाच्या कामाचा धडाका आणि मोठमोठ्या नेत्यांसोबतची त्याची ऊठबस पाहून त्यांना बरे वाटते. आज मला मुन्नाची आई म्हणून लोक ओळखतात, हा माझ्यादृष्टीने मोठा सन्मान असल्याचे त्या आवर्जून सांगतात. महाराष्ट्रात मुन्ना नावाचे अनेक तरुण असतील; पण मुन्ना म्हटले की, धनंजय महाडिक अशीच ओळख त्याने राज्यभर निर्माण केली आहे. मुन्नाचे कर्तृत्व पाहून त्यांचा ऊर भरून येतो, असेही शकुंतला सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com