
कुपवाड : कुपवाड (ता. मिरज) आणि (ता. तासगाव) येथून दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या एकजणास कुपवाड पोलिसांनी अटक केली. युवराज उर्फ महेश यशवंत म्हेत्रे (वय 25, रा. मराठी शाळेचा परिसर मणेराजुरी, ता. तासगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख ३७ हजाराच्या रुपये किंमतीच्या चोरीस गेलेल्या तीन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या.