कॅन्टर आणि ट्रकने चिरडल्याने मोटार सायकलचालक जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

कॅन्टर आणि ट्रकने चिरडल्याने मोटार सायकलचालक जागीच ठार झाला. बुधवार (ता.१) रात्री ९.२० च्या सुमारास सुतगट्टी गावाजवळ हा अपघात घडला.

कॅन्टर आणि ट्रकने चिरडल्याने मोटार सायकलचालक जागीच ठार

बेळगाव - कॅन्टर आणि ट्रकने चिरडल्याने मोटार सायकलचालक जागीच ठार झाला. बुधवार (ता.१) रात्री ९.२० च्या सुमारास सुतगट्टी गावाजवळ हा अपघात घडला असून बसाप्पा बाळाप्पा गुरव (वय ४८, रा. मनगुत्ती (ता. हुकेरी) असे मयताचे नाव आहे. अपघाताची नोंद काकती पोलिस ठाण्यात झाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक अक्षय आणि कॅंन्टर चालक किरण थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला असून अपघानंतर हे दोघेही फरार झाले आहेत. याप्रकरणी मयत बसापा यांची पत्नी मंगल यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. बसाप्पा हे काल रात्री ९.२० च्या दरम्यान मोटरसायकल क्रमांक केए २३ एन ६७९४ या मोटारसायकलवरून राजगोळी नजीकच्या क्वॉलिटी चिकन फॅक्टरीवर कामाला जाण्यासाठी सुतगट्टी राजगोळी रस्त्यावरून सुतगट्टीकडून शिवापूर गावाकडे जात होते.

त्यावेळी सुतगट्टी गावातील नाना मारुती लोंढे यांच्या घराजवळ शिवापूरकडून कतगट्टीकडे क्वालिटी चिकन घेऊन चाललेला कॅण्टर क्रमांक केए २२ डी ४३४९ वरील चालक किरण हा भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत होता. यावेळी कॅन्टरच्या मागून येणारा एमएच १० डब्ल्यू ७७४७ क्रमांकाचा साखर घेऊन येणारा ट्रक चालक अक्षय निष्काळजीपणे तसेच भरधाव चालवत होता. त्याने चिकनची वाहतूक करणाऱ्या कॅन्टरला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे समोरील कॅण्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने मोटारसायकलचालक बसाप्पाला धडक देत चिरडले. दोन्ही वाहने त्यांच्या अंगावरून गेल्याने मृतदेहाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती समजताच काकतीचे पोलिस निरीक्षक गुरुनाथ पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: Motorcyclist Was Killed On The Spot When Crushed By A Canter And Truck Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top