esakal | आंदोलन पेटले ः  शिराळ्यात रस्ता रोको 
sakal

बोलून बातमी शोधा

untitled 1.png

शिराळा : निष्क्रिय व तिघाडी राज्यकर्त्यांचा धिक्कार असो, गाय दुधास प्रतिलिटर 10 रुपये अनुदान व 30 रुपये दर मिळाच पाहिजे अशा घोषणा देत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शिराळा- इस्लामपूर रस्त्यावर शिराळा तालुका भाजपतर्फे रस्तारोको करण्यात आला. 

आंदोलन पेटले ः  शिराळ्यात रस्ता रोको 

sakal_logo
By
शिवाजीराव चौगुले

शिराळा : निष्क्रिय व तिघाडी राज्यकर्त्यांचा धिक्कार असो, गाय दुधास प्रतिलिटर 10 रुपये अनुदान व 30 रुपये दर मिळाच पाहिजे अशा घोषणा देत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शिराळा- इस्लामपूर रस्त्यावर शिराळा तालुका भाजपतर्फे रस्तारोको करण्यात आला. 

यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, सध्याच्या दूध दराने दूध उत्पादकांचा चाऱ्याचा खर्च निघत नाही. जनावरे पाळायची की विकायची हा प्रश्न भेडसावत आहे. पावडर निर्यातीला प्रती लिटर 50 रुपये अनुदान द्यावे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास शेतकरी या सरकारला रस्त्यावर फिरून देणार नाहीत.

सत्यजित देशमुख म्हणाले,दूध व्यवसाय ठप्प झाला तर शेतकऱ्यांना हा व्यवसाय बंद करावा लागेल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला जाईल. महाराष्ट्रात 62 लाख लिटर दूध अतिरिक्त आहे.त्यामुळे प्रती लिटर 10रुपये अनुदान तात्काळ द्यावे. अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू. 

यावेळी भाजपा तालुकाअध्यक्ष सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, महादेव कदम, के.डी. पाटील, प्रतापराव यादव, सम्राट शिंदे, रणजित कदम, प्रदीप कदम, योगेश कुलकर्णी, अविनाश माळी, प्रा.सम्राट शिंदे,शांताराम जाधव , संभाजी पाटील, विजय महाडिक यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. 
मांगले,आरळा, शेडगेवाडी,कणदूर,शिरशी, सागाव, फुफिरे फाटा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. 

  संपादन -अमोल गुरव