belgaum : महापौर निवडणूक दिवाळीनंतर?

हालचाली सुरु; आरक्षणाबाबतचा घोळ अद्याप कायम
belgaum corporation
belgaum corporationsakal media

बेळगाव : दिवाळी झाल्यानंतर लगेचच बेळगावची महापौर निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपच्या नगरसेवकांमध्ये ही चर्चा सुरु आहे. पण, कौन्सिल विभागाला निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही सूचना आलेली नाही. महापौर-उपमहापौर आरक्षणाबाबतचे स्पष्टीकरणही नगरविकास खात्याने अद्याप दिलेले नाही. त्यामुळे, निवडणुकीबाबतचा संभ्रम कायम आहे.

belgaum corporation
'आम्ही नाही ती अंडी उबविली'; मुख्यमंत्र्यांची 'भाजप'ला टोलेबाजी

महापालिका निवडणूक होऊन ६ नोव्हेंबर रोजी दोन महिने पूर्ण होणार आहेत. तत्पूर्वी महापौर निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते. पण, त्याआधी नगरविकास खात्याकडून महापालिका वा प्रादेशिक आयुक्तांना तशी सूचना यायला हवी. तशी सूचना अद्याप न आल्याने निवडणूक प्रक्रिया रेंगाळली आहे.

महापौर निवडणूक अद्याप न होण्यामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे. स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामांचे श्रेय महापालिकेला किंवा नव्या नगरसेवकांना मिळू नये यासाठी निवडणूक लांबणीवर टाकल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. शिवाय बेळगावचे महापौर व उपमहापौर आरक्षण भाजपसाठी अडचणीचे ठरत असल्याचीही चर्चा आहे. महापौरपद सामान्य प्रवर्गासाठी तर उपमहापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव आहे.

महापौरपदासाठी भाजपचे कन्नड व मराठी भाषिक नगरसेवक इच्छूक आहेत. त्यामुळे, मराठी महापौर करावा की कन्नड याबाबत भाजपमध्येच एकमत झालेले नाही. शिवाय महापौरपद दक्षिण मतदारसंघाला द्यावे की उत्तर याबाबतही निर्णय झालेला नाही. महापालिका निवडणूक काळात निकालानंतर सर्व राष्ट्रीय पक्षांनी एकत्र येऊन कन्नड महापौर करावा यासाठी कन्नड संघटनांनी पत्रकार परीषद घेतली होती. निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतरही कन्नड महापौर व्हावा यासाठी संघटनांचे प्रयत्न सुरु आहेत. बुडा अध्यक्षपद मराठी भाषिक संजय बेळगावकर यांना मिळाल्यामुळे महापौर कन्नड व्हावा अशी मागणीही होत आहे.

belgaum corporation
IND vs NZ मॅचआधी तडकाफडकी गॉफ यांना पंचांच्या यादीतून हटवलं!

आरक्षण बदलणार?

महापौर व उपमहापौरपदाच्या आरक्षणाबाबत स्‍पष्टीकरण विचारण्याण्यासाठी महापालिकेने नगरविकास खात्याला पत्र पाठविले आहे. पण, दीड महिन्यापासून त्या पत्राला नगरविकास खात्याने उत्तरच दिलेले नाही. त्यामुळे, आरक्षण बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत की काय, अशी शंका विरोधी गटाच्या नगरसेवकांकडून उपस्थित केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com