खासदार धैर्यशील माने यांना पोलिस अधिकाऱ्याने रोखले 

MP Patil Mane was stopped by a police officer
MP Patil Mane was stopped by a police officer

सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना पोलिस अधिकाऱ्यांनी सभागृहात जाताना रोखल्याने त्यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला. या प्रकाराबद्दल पत्रकारांशी बोलताना श्री. माने यांनी प्रशासनाला आता लोकप्रतिनिधीही ओळखेनात का ? असा सवाल करत येथील व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्‍त केली. 

जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दुपारी तीन वाजता होती. सभेसाठी पालकमंत्री जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, दोन्ही खासदार व समितीचे सदस्यांना निमंत्रित केले होते. नियोजित सभा तासभर उशिरा सुरू झाली.

दरम्यान काही वेळाने श्री. धर्यशील माने सभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहा समोर दाखल झाले, तर त्यांना यावेळी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलिस फौजफाट्याने अडविले. श्री. माने यांनी लोकप्रतिनिधींना आडवता काय म्हणून त्यांना जाब विचारला. या विषयावर खासदार माने संतापले, रस्त्यात अशाप्रकारे लोकप्रतिनिधीना अडविणे बरोबर नाही, म्हणून त्यांनी पोलिसांची कानउघाडणीही केली.

त्यानंतर श्री. तनपुरे यांनी मी बाजूला जात आहे. तुम्ही सभाग्रहात जावे, अशी विनंती माने यांना केली. त्यानंतर ते सभागृहात गेले. तत्‌पूर्वी आमदार मानसिंगराव नाईकांनाही अडविण्याचा प्रयत्न झाल्याचेही श्री. माने यांनी नमुद केले. पोलिस लोकप्रतिनिधींना ओळखत नाहीत काय? अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्तुळात सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com